प्रविण मोरेश्वर पाटील मिरा-भाईंदरमधील तरुण प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. ऑगस्ट २००७ पासून ते मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक १२ चे नगरसेवक आहेत .

भाईंदर मधील एका मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात १९७१ साली प्रविण मोरेश्वर पाटील जन्मले. ते शेतकरी कुटुंबातील आहे. शेतीव्यतिरिक्त ते ट्रान्सपोर्ट व्यवसाय देखील हाताळतात.

त्यांनी मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स [एमए] मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली होती. त्याच्या छंदांमध्ये चित्रकला, रांगोळी आणि पोस्टर मेकिंगचा समावेश आहे, जे दर्शविते की ते एक कलाकार आहेत. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी त्यांच्या पेंटिंग्स आणि पोस्टर मेकिंगसाठी अनेक पुरस्कार मिळवले.

१९९५ पासून ते शिवसेनेच्या "भारतीय विद्यार्थी सेना" मध्ये सक्रीयपणे सहभागी होते. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना शिवसेनेच्या प्रमुख पदावर नेऊन उभे केले. "हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे", "उद्धवजी ठाकरे", "एकनाथजी शिंदे" , "राजन विचारे "आणि "प्रतापजी सरनाईक" यांचा त्यांच्यावर प्रभाव आहे.

ऑगस्ट २००७ मध्ये, एमबीएमसीच्या वार्ड क्रमांक १२ चे नगरसेवक म्हणून प्रविण मो. पाटील यांची निवड झाली. त्यांच्या सामाजिक कार्यांमुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय झाले.

वैयक्तिक माहिती

नाव: प्रविण मोरेश्वर पाटील
वाढदिवस : १० एप्रिल, १९७१
कौटुंबिक व्यवसाय: शेती आणि ट्रान्सपोर्ट
शिक्षण: मास्टर ऑफ आर्ट्स (एम. ए.), मुंबई विद्यापीठ
छंद: चित्रकला, पोस्टर मेकिंग, आणि रांगोळी
आवडता खेळ: क्रिकेट

१) नगरसेवक /माजी उपमहापौर मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग क्रमांक १२

२) विशेष कार्यकारी अधिकारी (एस. ई. ओ.), महाराष्ट्र शासन

३) बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रम संस्थेचे सदस्य, तुंगारेश्वर परशुराम कुंड

४) आदर्श गावदेवी मित्र मंडळ नवघर चे सदस्य,