प्रविण मोरेश्वर पाटील यांच्या अधिकृत वेबसाइटवर आपले स्वागत आहे.


मनोगत


आपल्या समाजाकडून प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात म्हणून समाजाचा एक भाग म्हणून आपणही या समाजाचे काही देणे लागतो ही कर्तव्यबुद्धी आपल्यालाही विसरता येणार नाही. याच भावनेतून मीही या समाजाचे काही देणे लागतो म्हणून माझ्यापरीने अहोरात्र काम करण्याचा प्रयत्न केला आहे व सतत यापुढेही करत राहणार आहे.
या समाजाची सेवा करण्याची शक्ती मला जनतेच्या विश्वासातून मिळते, त्यामुळे माझा उत्साह वाढतो. मनाला उभारी येते आणि त्याचे वर्णन शब्दात व्यक्त करता येणार नाही असा आनंद मनाला मिळतो. अशा या सामाजिक आनंद यात्रेचा प्रवास करता करता याच समाजाने माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसात 'नगरसेवक' ते 'उपमहापौर' हा बदल घडवून आणला. या प्रवासामध्ये मला अनेक प्रकारचे लोक भेटले. हा प्रवास म्हटला तर कठीणही आणि जिद्दीने केला तर सहजही! मी ही परिणामांची पर्वा न करता सामाजिक कार्य करतच राहिलो आणि असंख्य सहकाऱ्यांचे हात मिळवत गेलो. नियती जणू मला सांगत होती, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे त्या समाज शक्तीचे म्हणजे नवघर, शिर्डीनगर, आदर्श इंदिरानगर आणि परिसरातील सर्व बंधू भगिनींचे देने आहे. ह्या प्रवासात अनेक जणांनी सहकार्य केले, आशीर्वाद दिले त्या सर्वांचे मी सदैव ऋणी आहे. चुकून कुणी दुखावला गेला असेल तर त्यांनी मला मोठ्या मनाने माफ करावे. या प्रवासात माझ्याकडून जी काही सेवा झाली आहे ती आपल्या माहिती आणि परीक्षणासाठी सचित्र रूपाने या वेबसाईटवर प्रकाशित केली गेली आहे. आपणच घडविलेल्या या समाजसेवकाने आणखी काय करावं याचा आदेश आपणच देणार आहात.
आपण साथ द्या नक्कीच प्रतिसाद मिळेल...